बलात्कार पिडीतेने दिला मुलीला जन्म,एकावर गुन्हा

बोराडी - Boradi - वार्ताहर :

शिरपूर तालुक्यातील वाडी येथे विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकावर शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान पिडीत महिला गरोदर राहिली होती. तिने एका मुलीला जन्म दिला.

याबाबत वाडी येथे राहणार्‍या पिडीत 24 वर्षीय विवाहितेने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ती आई व दोन वर्षाच्या मुलीसह घरात झोपलेली असतांना गावातील गोपाल सुरेश धनगर (वय 23) हा रात्री अकरा वाजेच्या सुमारास विवाहितेच्या घरात घुसला.

त्याने विवाहितेवर जबरीने शारीरिक लैंगिक अत्याचार केले. तिच्या आईला ऐकू येत नसल्यामुळे तिला काही कळले नाही. घटनेनंतर विवाहिता घाबरली होती.

त्यानंतर गोपाल धनगर याने विवाहितेला धमकी देत वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. बदनामीच्या भितीने तिने कोणालाही सांगितले नाही.

त्यानंतर साधारण तीन महिन्यानंतर तिला आपण गरोदर असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पिडीतेने गोपाल धनगर यास याबाबत सांगितले.

मात्र त्याने स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर दि. 20 एप्रिल रोजी तिला मुलगी झाली. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गोपाल सुरेश धनगर याच्या विरोधात भादंवि कलम 376(2), 457, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com