शेतातील ऊसासह झोपडी जाळणार्‍या संशयीताला अटक

शेतातील ऊसासह झोपडी जाळणार्‍या संशयीताला अटक

शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

शिरपूर बु. शिवारातील झोपडी व उसाला आग लावुन नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयीताला अटक केली आहे.

त्याला न्यायालयाने प्रथम एक दिवसाची पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.

येथील शेतकरी प्रमोद हरीलाल गुजराथी (रा.गुजराथी गल्ली, वरचे गांव, शिरपूर) यांची शिरपूर बु. गाव शिवारात शेती आहे. शेतात त्यांनी उसाची लागवड केलेली होती.

मात्र प्रकाश महारु चौधरी (रा. चौधरी गल्ली, शिरपूर) यांच्या शेतातील उस पिक हे महेश चौधरी याने जाळल्याचा संशय घेवुन प्रकाश चौधरी याने गुजराथी यांच्या शेतात अनधिकृतपणे प्रवेश केला.

शेतातील झोपडी आणि पिकांना आग लावली. त्यात 30 गुंठे उसाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी गुजराथी यांच्या फिर्यादीवरून प्रकाश चौधरी यांच्यावर दि. 7 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्याला अटक करून कारवाई करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com