शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

नवीन बांधकाम ठिकाणी उभी केलेल्या मालट्रकचे पाच टायर डिक्ससह अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शहराजवळ शिंगावे शिवारातील रामकृष्ण कॉलनीत घडली आहे.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिंगावे शिवारात रामकृष्ण कॉलनीत दिनेश कमलसिंग जमादार यांच्या मालकीच्या प्लॉट नंबर 78 च्या नवीन बांधकाम ठिकाणी स्वतःच्या मालकीचा माल ट्रक (क्र. एम एच 18 बीएफ 3883) हा उभा केलेला होता.

अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास 10 हजार रुपये किंमतीची डिझेल टाकी व 50 हजार रुपये किंमतीचे 5 टायर डिक्ससह चोरून नेले.

याप्रकरणी दिनेश कमलसिंग जामदार यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नारायण मालचे करीत आहेत.