शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

येथील अनाथ मतिमंद मुलांच्या बालगृहात दारुच्या नशेत अधिक्षकासह तिघांनी आरडाओरड करुन शांततेचा भंग केला. याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश आप्पा निकुम (रा. मांडळ शिवार, शिरपूर) यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. अनाथ मतिमंद मुलांचे बालगृहाचे अधिक्षक प्रदिप पाटील, शांताराम भिल, ज्ञानेश्वर कोळी (रा.सर्व मांडळ शिवार ता. शिरपूर) हे दि. 28 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास अनाथ मतिमंद मुलांचे बालगृहात दारुच्या नशेत आले.

तिघे आरडाओरड करुन गैरवर्तन करतांना मिळून आले. त्यानुसार तिघांवर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 85 (1) सह मुंबई पोलीस कायदा कलम 112, 117 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.