शिरपूर शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनेत वाढ

शिरपूर शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनेत वाढ

शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. शहरातील ओम नगर येथे 16 जुलै रोजी महिलेची चेन खेचून मोटारसायकलस्वार चोरट्यांनी पळ काढला. भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. चोरी करुन चोरटे वरझडी रस्त्याकडे फरार झाले.

याबाबत सरोज सुवर्णसिंह राऊळ (वय 42, रा.प्लॉट नं.40 ब, विद्या विहार कॉलनी, शिरपूर) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली. त्यांचे पती सुवर्णसिंह राऊळ एस.एस.व्ही.पी.एस. कॉलेज, शिंदखेडा येथे प्राध्यापक आहेत.

त्या 16 जुलैला दुपारी दोनला शेजारी ललिता गिरासे अशा दोन्ही जणी आशिर्वाद हॉस्पिटलजवळ नातेवाईक लताबाई रविंद्र गिरासे यांच्या घरी आशिर्वाद हॉस्पिटलजवळ साडी देण्यासाठी जात होत्या.

देना बँकेच्या अलिकडे ओमनगर येथे किशोर सोनवणे यांच्या घरासमोर त्या आल्यावर समोरून दोन संशयित एका विनानंबरच्या काळया रंगाच्या मोटार सायकलवर आले. त्यांनी मोटार सायकल हळूहळू चालवत राऊळ यांच्याजवळ आणली.

मोटारसायकलवर मागे बसलेल्या चौकटी ब्राऊनिश रंगाचा शर्ट घातलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत खेचली. त्यांनी आरडाओरड केल्याने रस्त्यावरील नागरिकांनी मोटारसायकलवरुन त्यांचा पाठलाग केला. मात्र संशयित वरझडी रोडकडे पळून गेले.

या घटनेत 18 ग्रॅम सोन्याची 56 हजार रुपये किंमतीची मंगलपोत चोरीस गेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान पोलिसांनी परिसरातून सीसीटीव्ही फुटेजमधून चोरट्यांचे छायाचित्र ताब्यात घेतले आहे. शहर पोलिसांनी अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com