शिरपूरात जुगार अड्डयावर छापा, 15 ताब्यात

शिरपूरात जुगार अड्डयावर छापा, 15 ताब्यात

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शिरपूर शहरातील पाचकंदिल परिसरात एका घरानजीक सुरु असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. 15 जणांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे काल दुपारी शिरपूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली.

जुगारा खेळणार्‍या धनराज निंबा पाटील यांच्याजवळ जुगार खेळणार्‍यांवर कल्पेश पाटील, सनी हजारे, मनोहर पाटील, लालचंद पाटील, अशोक गवळी, रफिक शेख, देवेंद्र पाटील, आनंदा धनगर, हर्षल मराठे, जयेश ईशी, भिकन मराठे, कुणाल सुतार, मिर्झा असफ बेग, आशिष साहेबराव पाटील यांना पकडण्यात आले.

त्यांच्याविरोधात मुंबई जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना पी.व्ही.अमृतकर करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com