असली शिवारातील गावठी दारू अड्डयांवर कारवाई

असली शिवारातील गावठी दारू अड्डयांवर कारवाई

शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी अवैध गावठी दारू निर्मिती करणार्‍यांवर धडक कारवाई केली. आज दि.7 रोजी सकाळी 6 वाजेपासून थाळनेर पोलिस ठाण्याचे सपोनि उमेश बोरसे यांनी पथकासह गावठी हातभट्टीच्या दारू अड्डयांवर कारवाई सुरू केली.

या मोहिमेत 1 लाख 22 हजार रुपये किंमतीची गावठी दारूसह साहित्य जप्त करून जागीच नष्ट करण्यात आले. आरोपी मात्र फरार झाले.

असली (ता. शिरपूर) गाव शिवारातील मोठा नाला या परिसरात झाडाझुडपांच्या आडोशाला राजेश उर्फ मंड्या कोळी (वय 25), नाना भिल (वय 40), अभिमन भिल (वय 28) व मगन उखडू वंजारी (वय 35) हे चारही इसम हे अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करत होते. त्यांचे विरुद्ध थाळनेर पोलिसात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई सपोनि उमेश बोरसे यांच्यासह उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, हवालदार दिलीप कांबळे, पोकाँ विजय जाधव, योगेश पिसे, सिराज खाटीक यांच्या पथकाने केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com