शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

सरपंच असल्याचे सांगत पार्टीसाठी पैशांची मागणी करत मोटार वाहन निरीक्षकला मारहाण केल्याची घटला काल दुपारी मुंबई- आग्रा महामार्गावरील हाडाखेड चेकपोस्टवर घडली. याप्रकरणी एकावर शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मोटार वाहन निरीक्षक महेश आनंदराव देशमुख (वय 44) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार काल सुरज अत्तरसिंग पावरा (रा. हाडाखेड) याने कार्यालयात येवून मी या गावाचा सरपंच आहे.

आज 31 डिसेंबर असून आम्हाला पार्टी करायची असल्याचे सांगत पाच हजारांची मागणी केली. त्यावर देशमुख यांनी पैसे देवू शकत नाही, असे सांगितले.

त्यानंतर तुम्हाला पाहुन घेईल, बोलून निघून गेला. पुन्हा मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत कार्यालयात येवून गावाचा सरपंच असल्याचे सांगत तुम्ही माझ्या गावात काम करता. जर तुम्ही पार्टीला पैसे दिले नाहीत तर गावात काम करू नका, अशी धमकी दिली.

बाहरे जाण्यास सांगितले असता सुरज पावरा याने निरीक्षक देशमुख यांच्या गणवेशाची कॉलर पकडून त्यांना हाताबुक्यांनी मारहाण केली.

तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. मारहाणीत देशमुख यांच्या गणवेशाची नेम प्लेट व बटन तुटून गहाळ झाले.

त्यानुसार शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सुरज पावरा यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.