शिरपूर येथे मोटर सायकलीच्या धडकेत एकाचा मृत्यू

शिरपूर येथे मोटर सायकलीच्या धडकेत एकाचा मृत्यू

शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

मोटार सायकलीच्या धडकेने शहरातील वाल्मिक नगर येथील टेलर काम करणारे रमाकांत (नंदु टेलर) दौलत भिलाणे धोबी (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाला.

सदर घटना दि. 26 मे रोजी दुपारी घडली असुन शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद करण्यात झाली आहे. शिरपूर येथे दुपारी एक वाजेच्या सुमारास रमाकांत दौलत धोबी हे मांडळ रोड वरील मलिक सर्विस सेंटरच्या समोर पायी चालत असतांना एका अज्ञात मोटर सायकलीने त्यांना जोरदार धडक दिली.

यात रमाकांत धोबी यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटने नंतर अज्ञात मोटर सायकल चालक घटनास्थळावरून फरार झाला.

पोलीस उपनिरीक्षक किरण बार्‍हे, संदीप मुरकुटे, पोलीस कॉन्स्टेबल भरत चव्हाण, अमित रणमाळे हे घटनास्थळी दाखल झाले.

या प्रकरणी शहर पोलीस स्टेशन येथे अपघाताची नोंद करण्यात झाली आहे. पुढील तपास पोलीस पानपाटील हे करीत आहेत. रमाकांत यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावाई, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com