शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आमोदे शिरपूर फाट्यावर उड्डाणपुलाखाली एकाच जागेवर दीड महिन्यात आज दुसर्यांदा वाहन चालकांना वाचविण्याच्या प्रयत्नात वाहन उलटले,

इंदूरकडून भाजीपाला भरून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणार्या वाहनासमोर शिरपूर फाट्यावर अचानक एक मोटारसायकल आल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने पुलाखाली उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर सदर वाहन उलटले.

या अपघातात ट्रॅक्टर चालक किरकोळ जखमी झाला असून तीन चार मोटारसायकली व उभा असलेला ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले.

असाच अपघात याच जागेवर दीड महिन्यांपूर्वी झाला होता, तर आज दि 18 रोजी सायंकाळी 7 वाजता फाट्यावर तिहेरी अपघात झाला.घटनास्थळी पोलीसांसह नागरिकांनी मदतकार्य केले.