शिंदखेड्यात नियमांचे उल्लघंन,दुकाने सील

शिंदखेड्यात नियमांचे उल्लघंन,दुकाने सील

शिंदखेडा - Shindkheda - प्रतिनिधी :

शहरात शासनाने परवानगी न दिलेल्या दुकानदारांनी दुकाने उघडी ठेवल्यामुळे गर्दी झाली. नियमांचे उल्लघंन केल्यामुळे तहसिलदारांनी दुकाने सील केली.

मेडिकल्स व जीवनावश्यक किराणा दुकाने, भाजी विक्रेते, फळ विक्रेते या व्यतिरिक्त दूध विक्रेते बेकरीवाले यांना सकाळी 11 वाजेपर्यत दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

मात्र इतर व्यावसायिक त्यात जनरल स्टोअर्स, सलून, पानटपरी, कापड दुकाने, लॉड्री दुकाने, बूट-चप्पल विक्री दुकाने यांना मात्र परवानगी नाकारण्यात आली आहे.

तरी दुकाने सुरू ठेवल्यामुळे गर्दी झाली. त्यामुळे आज इतर दुकानांना पुढील आदेश येई पावेतो तहसीलदार यांच्या सहीचे सील करण्यात आले.

या कार्यवाही तहसीलदार सुनील सैंदाणे, नगरपंचायत मुख्याधिकारी बिडगर, मंडळ अधिकारी पंडित दावळे, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे यांचा पथकाने केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com