शिंदखेडा रथोत्सव रद्द

दीडशे वर्षांची परंपरा खंडित
शिंदखेडा रथोत्सव रद्द

शिंदखेडा - Shindkheda - प्रतिनिधी :

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळावा, ही सामाजिक बांधिलकी ठेऊन यंदाचा रथोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची

माहिती रथ पंचांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुमारे दीडशे वर्षाची परंपरा यावर्षी प्रथमच खंडित होत आहे.

दरवर्षी शिंदखेडा रथोत्सव खर्‍या अर्थाने विजयादशमीपासून सुरू होतो. पालखीत बालाजींची मूर्ती ठेऊन गावातून सवाद्य मिरवणुकीने सिमोल्लंघनास जातात.

त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला बालाजी रथाची सवाद्य मिरवणूक निघते. दुसर्‍या दिवशी पालखी मिरवणूक असते.

दोन दिवस शहरात यात्रोत्सव असतो. विविध दुकाने लावली जातात. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होते.

मात्र या उत्सवास यावर्षी स्थगिती असल्याने सर्व व्यवहार मात्र ठप्प होणार आहे. रथोत्सवही रद्द करीत असल्याची माहिती श्री राम बालाजी मंदिराचे मठाधिपती मेघश्याम महाराज व रथपंच हिंमतसिंग राऊळ, श्रीराम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यंदाचा रथोत्सव मिरवणूक जरी रद्द असली तरी श्रीराम बालाजी महाराज मूर्तीची विधिवत पूजा होणार आहे. यासाठी सोशल डिस्टनसिंगचे पालन होणार आहे. विधिवत पूजा वेदशास्त्रसंपन्न वासुदेवशास्त्री दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

दि. 31 रोजी रथ मिरवणूक ज्या दिवशी आहे, त्या दिवशी सुदर्शन चक्र पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात राऊळ घराण्याकडे आरतीचा मान असतो. तोही होणार आहे. दरवर्षी रथावर विराजमान असणारे सर्व पुरोहितांचाही उपस्थिती असणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com