पक्ष्यांचा मृत्यू; बर्ड फ्लूची भीती, चर्चेला ऊत

प्रयोगशाळेत पाठविले पक्ष्यांचे नमुने
पक्ष्यांचा मृत्यू; बर्ड फ्लूची भीती, चर्चेला ऊत

शिंदखेडा - Shindkheda - प्रतिनिधी :

शिंदखेडा शहरातील लक्ष्मी नारायण कॉलनी परिसरात दोन पक्षी मृतावस्थेत आढळून आले आहे. एकीकडे बर्ड फ्ल्यू राज्यात पसरला आहे.

त्यातच दोन पक्षांचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मयत पक्षांचे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत.

त्याबाबतचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे त्या पक्षांचा मृत्यू कशाने झाला हे मात्र समजू शकले नाही.

पक्षी मयत झाल्याची घटना लक्ष्मी नारायण कॉलनीतील प्रभाग क्र. 9 मध्ये घडली आहे. पक्षी मयत झाल्याबाबत महेश चव्हाण यांनी नगरसेवक सुनील चौधरी यांना माहिती दिली.

त्यांनी दखल घेवून याबाबत नगरपंचायतीशी संपर्क साधला. नगरपंचायत प्रशासनाने पशू वैद्यकीय विभागाला याबाबत माहिती दिली.

डॉ. हितेंद्र पवार, जितेंद्र गिरासे, विक्रम बैसाणे यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. त्यानंतर डॉ. पवार यांनी मुख्य पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश शिंदे यांना याबाबत माहिती दिली.

डॉ. शिंदे यांच्या सुचनेनुसार मृत पक्षी त्यात एक कबुतर व एक टिटवी असे दोन मृत पक्षी ताब्यात घेवून पुणे येथे पाठविले. या दोन्ही पक्षांचा मृत्यू नेमका कशाने झाला. हे प्रयोग शाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होईल.

यावेळी प्रा. प्रदीप दीक्षित, नगरसेवक सुनील चौधरी, जीवन देशमुख, जय सोनवणे, छत्रपाल गिरासे, हर्षल पवार, महेश चव्हाण आदी उपस्थित होते. दोन पक्षांच्या मृत्यूमुळे सध्या चर्चेला ऊत आला आहे. पक्षांचा मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट झालेले नाही. तरी देखील बर्ड फ्ल्यूची भिती व्यक्त केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com