घोटाळे बघून धर्म भास्करही म्हणेल.. बापरे बाप!

भाजपचे नेते माजी मंत्री आ.आशिष शेलार यांची राज्य सरकारवर टिका
घोटाळे बघून धर्म भास्करही म्हणेल.. बापरे बाप!

धुळे | दि.४ | Dhule प्रतिनिधी

धुळे जिल्हा परिषदेच्या Dhule Zp कोट्यवधीच्या अपहार प्रकरणाचा मुख्य सुत्रधार भास्कर वाघ Bhaskar Wagh याची राज्यातील जनतेला सातत्याने आठवण व्हावी आणि घोटाळ्यांमध्ये धर्मभास्करचेही बाप निघावे असे एक-एक घोटाळेबाज चेहरे ठाकरे सरकारच्या काळात उघड होत आहेत. हे घोटाळे बघून धर्मभास्करही म्हणले, बापरे बाप! अशा शेलक्या शब्दात भाजपा नेते आ.आशिष शेलार BJP leader and former minister MLA Ashish Shelarयांनी राज्यसरकारवर टिका केली. हे सरकार शेतकर्‍यांचे रक्षणकर्ते नाही असे म्हणत पुरग्रस्तांच्या मदतीची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

माजी मंत्री आ.शेलार हे सध्या उत्तर महाराष्ट्र दौर्‍यावर आहेत. नंदुरबार पाठोपाठ आज त्यांनी धुळ्यात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेवून त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या प्रसंगी अनुप अग्रवाल, माजी महापौर चंद्रकांत सोनार, सभापती संजय जाधव, बबन चौधरी यांच्यासह भाजपा चे पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई विमान तळाच्या नावाबाबात विचारले असता आ.शेलार म्हणाले की, छत्रपती शिवरायांचे नाव कोणीही हटवू शकत नाही. ते नाव भाजपाच्या काळातच दिले गेले आहे. त्याचा ठराव राज्य सरकार ने पारीत केला आहे. अदानीचा ठराव पारीत करून राज्य सरकारने अदानीला छ. शिवरायांचे नाव झाकण्याची संधी दिली आहे का? असा प्रश्न त्यांनी केला आहे. तसेच नवाब मलिक हे अदानी चे जवळचे मित्र असून त्यांनी हिंमत असेल तर ठराव रद्द करावा असे आव्हान आशिष शेलार यांनी राज्य सरकारला दिले आहे.

राज्य सरकारने लॉकडाऊन बाबत दिलेली शिथिलता आहे की जनतेची ही अजून छळवणूक आहे, हे नागरिकांना व राज्य सरकारच्या मंत्र्यांना देखील कळत नाही. लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल मध्ये प्रवास दिला जात नाही. याबाबत उच्च न्यायालया ने देखील सवाल विचारला आहे. एकीकडे सर्व सामान्यांना प्रवास द्यायचा नाही दुसरीकडे शासकीय कार्यालये पूर्ण क्षमते ने भरणार, ही शासनाची दुट्टपी भूमिका असल्याचे ते म्हणाले. तसेच पोलिसांच्या बदल्यामध्ये दलाली सुरु आहे. त्यामुळे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होत असून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सरकार शेतकर्‍यांचे नसून भ्रष्टाचारा चे असल्याचे ते म्हणाले.

राज्याचे अनेक प्रश्न प्रलंबित असून आदिवासी समाजाच्या खावटी मध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे शेलार म्हणाले. हे सरकार म्हणजे तीन कारभारी आणि रोज बदला अधिकारी, असे असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुस्लिमांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात समाविष्ट करण्याच्या मोहन भागवत यांच्या विधानावर बोलताना शेलार म्हणाले की, जो मुस्लिम वंदे मातरम व भारत माता की जय असे म्हणेल ते सर्व आमचे असल्याचे ते म्हणाले. यावर त्यांनी अधिकचे भाष्य टाळले.

राज्यपालांची भिती का?

सरकार निष्क्रीय आहे, म्हणून राज्यपाल सक्रीयपणे काम करीत आहेत. राज्यातील सत्यस्थिती केंद्रापुढे मांडण्याचे काम करणार्‍या राज्यपालांची सरकारला ऐव्हढी भिती का वाटते? यात सरकारचे पितळ उघडे पडण्याची भिती असावी, असेही आ.शेलार म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com