हस्ती स्कूलच्या 52 विद्यार्थ्यांना स्काऊट राज्य पुरस्कार

हस्ती स्कूलच्या 52 विद्यार्थ्यांना स्काऊट राज्य पुरस्कार

दोंडाईचा । वि.प्र. Dondaicha

हस्ती चँरिटेबल ट्रस्ट संचलित, हस्ती पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड ज्यु. कॉलेजच्या 52 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईड संस्थेतर्फे स्काऊट राज्य पुरस्कार मिळाला.

हस्ती पब्लिक स्कूल, दाउळ शिवार कॅम्पस् दोंडाईचा येथे कोवीड -19 च्या नियमांचे पालन करीत परिक्षा घेण्यात आली. या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात हस्तीचे एकुण 52 स्काऊट राज्य पुरस्कारासाठी पात्र ठरले आहेत. या सर्व पात्र विद्यार्थ्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.

यात प्रसन्न अहिरराव, यश बागल, कृष्णा बाविस्कर, आरूष भामरे, विराज गिरासे, देवेश माळी, व्यंकटेश माळी, हर्षल पाटिल, निखील पाटिल, निरंजन पाटिल, लक्ष पवार, स्वामी शहा, धिरज ठाकरे, यश वाणी, आर्यन भावसार, प्रेमसिंग गिरासे, पियुश गुजराथी, प्रेमराज पाटील, वेद पाटील, यश पाटील, भावेश पटेल, निखील पवार, सिद्धेश सदाराव, आयुष शिनकर, मोनिष शिंत्रे, सक्षम उपाध्ये, अमय भावसार, तनुष भावसार, कृष्ण चित्ते, राजेंद्र गिरासे, तन्मय गिरासे, तुषार गिरासे, कलश जैन, देवांत खैरनार, वैष्णव खैरनार, सुमित महाजन, मोक्षीत पाटिल, नितीन पाटिल, दर्शन परदेशी, ऋषीकेश पवार, पृथ्वी राजपूत, खुषण रूपचंदाणी, रोहन गुजराथी, आगम जैन, वैभव जैन, रोशन विजयकुमार, ईशान माहेश्वरी, अमेय मालपूरकर, कार्तिक निकम, चिन्मय पाटील, आदित्य शिंदे व विरेंद्र चव्हाण या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी धुळे जिल्हा स्काऊट आयुक्त संतोष सोनवणे, धुळे जिल्हा स्काऊट प्रशिक्षण आयुक्त गणेश फुलपगारे, हस्ती स्कूल स्काऊट गाईड विभाग प्रमुख किशोर गुरव, स्काऊट मास्टर प्रविण गुरव, नरेश सावंत, मनोहर यादव यांचे मार्गदर्शन लाभले. तर स्थानिक शालेय सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. विजय नामजोशी, हस्ती स्कूल शालेय समिती चेअरमन कैलास जैन, प्राचार्य हरिकृष्ण निगम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

हस्ती स्कूल येथे दरवर्षी नियमितपणे स्काऊट गाईड चळवळी अंतर्गत अशा स्वरूपाचे पुरस्कार शिबीर व विविध उपक्रम यांचे आयोजन केले जाते. याद्वारा विद्यार्थ्यांवर स्वयंशिस्त, स्वावलंबन, शिल संवर्धन, आरोग्य, व्यवसाय व सेवा गुणांचे मूल्य संस्कार रूजविले जातात. असे हस्ती स्कूल शालेय समिती चेअरमन कैलास जैन यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com