धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरात करोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे. यामुळे दहावी व बारावीचे वर्ग वगळून पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग प्रतिबंधकात्मक उपाययोजना म्हणून

दि. 29 मार्चपर्यंत मनपा हद्दीतील सर्व शाळा बंद राहतील अशी माहिती महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी महेंद्र सोनवणे यांनी दिली आहे.

करोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे शासन मार्गदर्शक सूचनेनुसार महापालिका हद्दीतील इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग वगळून

पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग दि. 29 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. असे श्री. सोनवणे यांनी सांगितले.