स्वच्छतेची आयुक्तांनी केली पाहणी

स्वच्छता निरिक्षकांची घेतली झाडाझडती, घंटागाड्यांबाबत देखील घेतला आढावा
स्वच्छतेची आयुक्तांनी केली पाहणी

धुळे Dhule। प्रतिनिधी

आरोग्य विभागाचा आज आयुक्त अजिज शेख, Commissioner Aziz Sheikh अति. आयुक्त नितीन कापडणीस Att. Commissioner Nitin Kapdanis, उपायुक्त गणेश गिरी Deputy Commissioner Ganesh Giri यांनी आढावा घेतला. शहरांमध्ये अचानक फेरफटका मारुन सर्व स्वच्छता निरीक्षक व मुख्य निरीक्षक यांची झाडाझडती घेण्यात आली.

देवपूर, कुमारनगर, स्टेशन रोड, चाळीसगाव रोड, हजारखोली परिसरात विविध ठिकाणी पाहणी केली. यात आयुक्त अजीज शेख यांनी जे नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात व प्रामुख्याने गॅरेजवाले, हातगाडी, दुकानदार अशा वर्गातील बहुतांशी नागरिक कचरा रस्त्यावर टाकतात असे निदर्शनात आले. अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना मुख्य स्वच्छता निरीक्षक व सर्व स्वच्छता निरीक्षक यांना आयुक्तांनी दिल्या.

प्रभागांमध्ये संबंधित स्वच्छता निरीक्षकाला बोलावून त्या ठिकाणी घंटागाडींचा आढावा घेण्यात आला. ज्या ठिकाणी कचर्‍याचे प्रमाण जास्त होते अशा ठिकाणी स्वच्छता निरीक्षकांनी त्यांच्या कामामध्ये सुधारणा न केल्यास संबंधित स्वच्छता निरीक्षकावर कायदेशीर कारवाई केली जाईल. अशी तंबीही आयुक्तांनी दिली. सर्व स्वच्छता निरीक्षक यांनी त्यांच्या कामात सुधारण्यासाठी त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

आपआपल्या प्रभागातील घंटागाड्यांचे योग्य नियोजन करावे. नालेसफाई व गटार सफाई नियमितपणे करावी. रस्त्यावर कचरा फेकणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

मलेरिया फवारणी विभागाकडून नियमित करण्यात यावी. तसेच आयुक्त यांनी अग्निशमन दलाच्या कार्यालयास भेट देऊन अग्निशमन विभागातील स्वच्छता उपस्थित कर्मचारी व वाहन याबाबतचा आढावा घेण्यात आला. तसेच हजारखोली परिसरातील सार्वजनिक दवाखान्यातील कोविड लसीकरण केंद्रास भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली.

आयुक्त अजिज शेख यांनी स्वच्छता निरीक्षक व मुख्य निरीक्षक यांना शहरातील आरोग्याबाबत अडचणींवर व समस्यांवर तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा संबंधित स्वच्छता ही निरीक्षकावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल अशा सूचनाही दिलेल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com