महसूल विभागाची कारवाई : वाळूचे सात ट्रॅक्टर पकडले

महसूल विभागाची कारवाई : वाळूचे सात ट्रॅक्टर पकडले

शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

तालुक्यात वाळूचा अवैध उपसा करून वाहतूक करणार्‍या वाळू माफियांवर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारत एकाच दिवसात तालुक्यात विविध ठिकाणी महसूल विभागाच्या पथकाने सात ट्रॅक्टरवर कारवाई करुन वाहने जप्त केली आहेत.

तालुक्यातील तापी नदी पात्रातून व नदी नाल्यातून वाळूचा विनापरवाना उपसा करून अवैध वाहतूक होत असल्याने उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रमसिंग बांदल व तहसीलदार आबा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तलाठी व कर्मचार्‍यांचे पथके तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

सदर पथकांनी दि. 28 मे रोजी दिवसभरात विविध ठिकाणी जावून अवैध व विनापरवाना वाळूचा उपसा करणार्‍या सात ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली.

दंडात्मक कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात वाहने जप्त केली आहेत. त्यात वनावल, बाळदे शिवारात चार तर सांगवी एक, उपरपिंड एक, शिरपूर शहादा रस्त्यावर एक असे एकूण सात ट्रॅक्टरांचा समावेश आहे.

सदर कारवाई नायब तहसीलदार गणेश अढारी, मायानंद भामरे, मंडळ अधिकारी पी.पी.ढोले, व्ही. के. बागुल, भटू बोरसे, प्रभाकर गावित, प्रविण मराठे, संजय जगताप, तलाठी के.एम.चव्हाण, बंडू नाना, बी.आर.सानप, भूषण चौधरी, आर.एन.खान, संदीप महाजन, एन.एस.पटेल, डी.डी येशी, पंकज महाले, पृथ्वीराज गिरासे, कार्यालयीन सहायक लक्ष्मण गोपाळ, वाहन चालक मुकेश विसपुते, सतीष पाटोळे, संजय कोळी, पवन कोळी आदींनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com