धुळे

‘त्या’ वसतिगृहाच्या गृहपाल निलंबित

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

वसतीगृहात विद्यार्थीनीने स्वतची प्रसुती करून बाळाला फेकून दिल्याप्रकरणी साक्रीतील सावित्रीबाई मुलींचे शासकीय आदिवासी निवासी वसतीगृहाच्या गृहपाल अश्वीनी पी वानखेडे यांना कर्तव्यात कसुर केल्याचा आरोप ठेवून निलंबीत करण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाचे नाशिक अप्पर आयुक्त गिरीष सरोदे यांनी हे आदेश जारी केले आहेत. याप्रकरणात वसतीगृतील इतरही घटक चौकशीच्या फेर्‍यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

साक्री शहरातील या वसतीगृहात रविवारी एका विद्यार्थीनीने टॉयलेटमध्ये स्वत: प्रसुती करुन घेवून बाळाला फेकून दिले.सावित्रीबाई मुलींचे शासकीय मात्र बाळाच्या रडण्याच्या आवाजामुळे हे बिंग फुटले. त्यानंतर गुन्ह दाखल होवून संबंधीत मुलीला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही विद्यार्थीनी कृषी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत असुन या आदिवासी निवासी वसतीगृहात राहते. तिने स्वत: टॉयलेटमध्ये प्रसुती करुन नंतर बाळाला बादलीमध्ये टाकून वसतीगृहाच्या जवळ बाळाला फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला.

वसतीगृहातील त्या युवतीने दोन महिन्यापुर्वीच साक्री शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली होती. त्या तपासणीत डॉक्टरांनी तिचा रिपोर्ट नील दाखविला होता. त्यानंतर दोन महिन्यातच त्या विद्यार्थीनीने एका बालकाला जन्म दिल्याने साक्री ग्रामीण रूग्णालयाच्या कारभाराबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. वसतीगृहात विद्यार्थीनींची नियमित आरोग्य तपासणी होत नाही काय? त्यात ही बाब आली नाही का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

आदिवासी विभागाने या घटनेची तातडीने दखल घेवून कर्तव्यात कसून केल्याचा ठपका ठेवत गृहपाल अश्वीनी वानखेडे यांना निलंबीत केले आहे.

गृहपालवर खापर, इतरांचे काय?

वसतीगृहातील मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी गृहपाल यांची असल्याने त्यांना या घटनेत ठपका ठेवून निलंबीत करण्यात आले आहे. परंतू इतर घटकांचे काय?, ज्यांच्यावर आरोग्य तपासणीची जबाबदारी आहे त्याचे काय? ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टरांनी कशाच्या आधारावर तिचा नील रिपार्ट दिला? यांचीही कसून चौकशी व्हावी, अशी मागणी होते आहे.

Deshdoot
www.deshdoot.com