साक्रीत दोन जण एक वर्षासाठी हद्दपार

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

साक्री शहरातून दोन जणांना एक वर्षासाठी धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबत पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित यांनी आदेश दिला आहे.

साक्री शहरातील गढी भिलाटी येथे राहणारा गोविंदा दशरथ सोनवणे याच्यावर भादंवि 143, 147, 148, 324, 143, 354, 143, 147 तसेच 353, 143, 147, आपत्ती व्यवस्थापन कायदा कोविड प्रमाणे आणि नितीन दशरथ सोनवणे याच्यावर भादंवि 143, 354, 143, 147, 353, 143, 147 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वेय गुन्हे दाखल आहेत.

या दोघांना हद्दपार करण्याबाबत पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता.

त्यानुसार दोघांना संपुर्ण धुळे जिल्हा, नंदुरबार तालुका, मालेगाव तालुका, सटाणा तालुका या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश श्री.पंडित यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com