एकाच रात्री तिघा भावांकडे घरफोडी

एकाच रात्री तिघा भावांकडे घरफोडी

सव्वा लाखांचा ऐवज लंपास

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

साक्री तालुक्यातील गंगापूर येथे चोरट्यांनी एकाच रात्री तिघा भावांकडे धाडसी घरफोडी केली. रोख रक्कमेसह साडेपाच लाखांचा मुद्येमाल लंपास केला असून या घटनेमुळे गावात भिती निर्माण झाली आहे.याप्रकरणी साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगापूर येथे राहणारे शेतकरी शंकर बापु गरदरे (वय 45) यांच्यासह त्याचा भाऊ विठ्ठल बापु गरदरे व मावसभाऊ दिनेश भाऊराव गरदरे यांचे घर बंद होते.

ही संधी साधत काल दि. 24 रोजी रात्री चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.

शंकर गरदरे यांच्या घरातील लोखंडी कोठीतून व इतर दोघा भावंडांच्या घरातील कपाट व कोठीत ठेवलेले रोकड व सोन्या-चांदींचे दागिने असा एकुण 5 लाख 52 हजारांचा मुद्येमाल लंपास केला.

सकाळी नऊ वाजता ही घटना त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी साक्री पोलिसांना कळविले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदिप मैराळे, पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

याप्रकरणी शंकर गरदरे यांच्या फिर्यादीवरून साक्री पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास निरीक्षक दिनेश आहेर करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com