दुचाकी अपघातात साक्री नगरपंचायत कर्मचारी ठार
अपघात

दुचाकी अपघातात साक्री नगरपंचायत कर्मचारी ठार

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

साक्री तालुक्यातील अंबापूर रस्त्याजवळ भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार नगरपंचायत लिपीक तरूण ठार झाला.

सोमवारी सायंकाळी हा अपघात झाला. याप्रकरणी एका दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप गोविंदराव भिंगारे (रा. मुकुंद नगर, साक्री) असे मयत लिपीकाचे नाव आहे. तो सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्याच्या दुचाकीने (क्र. एमएच 18 एडी 1036) कामावरून राष्ट्रीय महामार्गाने घरी जात होतो.

त्यादरम्यान अंबापूर रस्त्याकडे वळण घेतल्यावर त्याला समोरून येणार्‍या भरधाव दुचाकीने (क्र. एमएच 18 बीएस 1869) जोरदार धडक दिली.

त्यात संदीप हा दुचाकीवरून खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी धनंजय गोविंद भिंगारे याने साक्री पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून धड दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक निकम करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com