आजपासून एक पाऊल निरोगी आयुष्याकडे !

आजपासून एक पाऊल निरोगी आयुष्याकडे !

रोटरी क्लब धुळे क्रॉसरोड आणि दै. देशदूतचा उपक्रम, दररोज दुपारी 4 वाजता

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

करोनाच्या संकटातून सावरण्यासाठी, जबाबदारीने खबरदारी घेण्यासाठी रोटरी क्लब धुळे क्रॉसरोड आणि दै. देशदूतच्या वतीने आजपासून विधायक, मार्गदर्शक उपक्रम राबविण्यात येत आहे.

दररोज सायंकाळी 4 वाजता विविध तज्ज्ञ मार्गदर्शकांचे वेगवेगळ्या विषयांवर ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन होणार आहे.

मात्र आजचे उद्घाटन सत्र सायंकाळी 6 वाजता होईल. प्रारंभी धुळ्यातील स्वामी नारायण मंदिराचे विलोभणीय दृष्य दाखविले जाईल. त्यानंतर पूज्य आनंदजीवन स्वामी मार्गदर्शन करतील.

करोना काळातील संकटापासून वाचण्यासाठी विविध आजारांवर त्या-त्या विषयाचे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्याशी संवाद साधणार आहे.

यात डॉ. मंदार म्हसकर(कोरोना- प्रतिबंध व उपचार), डॉ. दीपक शेजवळ (कोरोनाबाबतची खबरदारी), डॉ. विशाल वाणी (मौखीक आरोग्य), डॉ. जगदीश गिंदोडीया (योगाभ्यास), डॉ. चारुहास जगताप (कोरोना नंतरच्या व्याधी), डॉ. कावेरी जोशी (मानसोपचार व जीवनमंत्र), डॉ. अभिनय दरवडे (तिसरी लाट व बालके), डॉ. सागर वाघमारे (फिजीओथेरपी - नवी आशा), डॉ. ज्योती तिवारी (डोळ्याचे आरोग्य), डॉ. अश्विनी शिंदे (स्त्रीयांचे आजार व उपचार), डॉ. कविता बिरारी (आरोग्याबाबत हलगर्जीपणा नको) या विषयांचा यात समावेश असून रोटरीच्या फेसबुक पेजवर तर देशदूतच्या युट्युब अकौंटवर या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे.

जास्तीत जास्त दर्शकांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com