मद्य विक्रीच्या वेळेबाबत सुधारित निर्बंध लागू !

मद्य विक्रीच्या वेळेबाबत सुधारित निर्बंध लागू !

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्रीच्या वेळेबाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सुधारित निर्बंध लागू केले आहेत.

सुधारित आदेशानुसार मद्य विक्रीची वेळ अशी (अनुक्रमे अनुज्ञप्तीचा प्रकार, वार, अनुज्ञप्ती सुरू करण्याची वेळ, अनुज्ञप्ती बंद करण्याची वेळ) एफएल-1 (विदेशी मद्य घाऊक विक्रेते), सकाळी 7, सायंकाळी 6. सीएल-2 (देशी मद्य घाऊक विक्रेते), सकाळी 7, सायंकाळी 5. एफएल -3 (परवाना कक्ष), सोमवार ते शुक्रवार, सकाळी 9, दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के ग्राहक क्षमतेसह, त्यानंतर दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत फक्त होम डिलिव्हरी पध्दतीने. एफएल-2 व त्यास संलग्न सीएल/एफएल/टीओडी-3, सोमवार ते शुक्रवार, सकाळी 9, दुपारी 4 वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत फक्त होम डिलिव्हरी पध्दतीने. सीएल-3, सोमवार ते शुक्रवार, सकाळी 7, दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के ग्राहक क्षमतेसह त्यानंतर दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत फक्त होम डिलिव्हरी पध्दतीने.

टी. डी. 1, सोमवार ते शुक्रवार, सकाळी 7, दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के ग्राहक क्षमतेसह. एफएलबीआर-2, सोमवार ते शुक्रवार, सकाळी 9, दुपारी 4. त्यानंतर दुपारी 4 ते रात्री नऊ वाजेपर्यंत फक्त होम डिलिव्हरी पध्दतीने.

या अनुज्ञप्त्या व्यतिरीक्त इतर सर्व मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या शासन व स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार पुढील आदेश होईपर्यंत बंद राहतील. केवळ एफएल-2 व त्या संलग्न सीएल/ एफएल/ टीओडी-3, एफएल-3, नमुना सीएल-3 (किरकोळ मद्य विक्री) व एफएलबीआर-2 या अनुज्ञप्त्यांना शनिवारी व रविवारी सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत होम डिलिव्हरी सुविधा देता येईल.

कोविड- 19 संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत शासनस्तरावर तसेच स्थानिक प्रशासनाद्वारे तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, धुळे यांचे आदेश क्र.उ/कक्ष-3/गृह/पीओएल/कावि/882/2021, दि. 26 जून 2021 रोजी दिलेले व यापुढे दिले जाणारे सर्व निर्देश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे सर्व अनुज्ञप्तीधारकांना बंधनकारक राहील. त्यात कसूर झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com