राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 च्या डागडुजीच्या कामाला सुरुवात

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 च्या डागडुजीच्या कामाला सुरुवात

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

आ.फारुख शाह यांच्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र.6 च्या डागडूजीच्या कामास सुरुवात झाली आहे.

शहरा लगतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 च्या अखत्यारीत येणार्‍या चाळीसगाव चौफुली ते नगावबारी ते पुढे महामार्गापर्यत मोठमोठे खड्डे पडले होते.

या खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात अनेक अपघात होऊन अनेक प्रवाशांचा मृत्यू देखील झालेला होता. तसेच शहर हद्दीतील जुने चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन जवळील वडजाई रोड पुलाच्या सर्विस रोडची झालेली दुरवस्था तसेच याठिकाणी पथदिवे बंद असल्यामुळे अंधाराचा फायदा घेत चोरीचा व दरोड्याच्या अनेक घटना लॉकडाऊनच्या काळात घडलेल्या आहेत. याची अनेकांनी शहराचे आमदार फारूक शाह यांच्याकडे तक्रार केली होती.

म्हणून शाह यांनी मागील आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 च्या प्रकल्प संचालक अरविंद काळे, रवींद्र इंगोले, टोल नाक्याचे व्यवस्थापक जाधव तसेच काम करणारी यंत्रणा व कर्मचारी यांच्या समवेत संयुक्त पाहणी केली होती. त्यात आलेल्या तक्रारी आणि समस्यांवर चर्चा केली होती.

या संदर्भात आज ठिकाणी डागडुजी करून बंद असलेले पथदिवे सुरु करण्याचे काम तसेच इतर समस्यांवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चे सर्व अधिकारी आणि काम करणारी यंत्रणा यांनी सुरु केले.

लवकरच या महामार्गाची दुरुस्ती होवून रस्ता सुव्यवस्थित होईल. यामुळे अपघात होणार नाहीत असे आ.शाह यांनी सांगितले. रस्ता दुरुस्ती बरोबरच पथदिवे सुरु करण्याबाबतही संबंधित अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पथदिवे सुरु झाले तर चोर्‍यांचे प्रमाण कमी होईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com