कंत्राटी पद्धतीने 78 पदांची होणार भरती

आ. फारूक शाह यांच्या पाठपुराव्याला यश
कंत्राटी पद्धतीने 78 पदांची होणार भरती

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय हिर वैद्यकीय महाविद्यालयात वर्ग तीन व चार चे 78 पदे भरण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. आ.डॉ.फारुक शाह यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता.

याठिकाणी वैद्यकीय सुविधा देणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या कमी दिसून येत होती. याबाबत शहरातील स्थानिक संघटनांनी अनेकदा निवेदन सादर केलेले होते.

याच अनुषंगाने लघुवेतन कर्मचारी संघटना तसेच महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना व यासारख्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या संघटनांनी आ.फारूक शाह यांची भेट घेत निवेदन सादर केले होते. या निवेदनांचा त्यांनी पाठपुरावा केला.

वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, हे 545 खाटांचे झाले असून त्यात बरेचशी पदे ही रिक्त दिसून येत होती.

या सर्व गोष्टींचा आढावा घेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेत सातत्याने श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड-19 आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी वर्ग 3 व 4 अशा 78 पदांची नवीन भरती करावी अशी मागणी करत पाठपुरावा सुरु ठेवला होता.

या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे कंत्राटी पद्धतीने 78 पदांची नवीन भरती होणार आहे.

या आशयाचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकांचे कंत्राटी पद्धतीने सदर पदभरती करावी अशा लेखी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभागावर पडणार जास्तीचा भार कमी होऊन वैद्यकीय कर्मचार्‍यांना खूप मोठी मदत होणार आहे.

त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल यात शंका नाही. या महामारीच्या थैमानातून धुळेकरांची लवकर सुटका होईल असा विश्वास आ.शाह यांनी व्यक्त केला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com