राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ग्रा.पं.तींची दोन कोटींची वसूली

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ग्रा.पं.तींची दोन कोटींची वसूली

धुळे Dhule। प्रतिनिधी

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये (National People's Court) धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची (Gram Panchayat) एक कोटी 94 लाख रुपयांची वसुली झाली आहे. तर प्रलंबित 7981 प्रकरणे ज्यामध्ये धनादेश न वटल्याच्या केसेस, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, कुंटुंबिक वाद प्रकरणे ठेवण्यात आली होती. तसेच वादपुर्व 54024 प्रकरणे ज्यामध्ये बँकेची थकबाकी प्रकरण, फायनान्स प्रकरण ठेवण्यात आली होती.

दि. 25 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये धुळे जिल्हा परिषदेतील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला. ग्रामपंचायतींची अनेक वर्षांपासूनची घरपट्टी व पाणीपट्टी थकीत होती. अनेक ग्रामपंचायतींचे वीज देयक देखील न भरू शकल्यामुळे त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले होते. अनेक ग्रामपंचायतींच्या विहिरी बंद पडल्या होत्या. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीसमोर त्यांची घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करून वीज देयक भरणा केल्याशिवाय पर्याय नव्हता.

परंतु ग्रामसेवकांनी किती ही विनंती करून घरपट्टी व पाणीपट्टीची थकीत बिल ग्रामस्थ भरत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ग्रामपंचायतीच्या थकीत रक्कम वसूल करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. एच. मोहम्मद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव डॉ. डी. यु. डोंगरे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यांचे गटविकास धिकारी, यांच्यासोबत बैठका झाल्या. ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक देखील बैठका जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात घेण्यात आल्या.

त्याप्रमाणे कृती कार्यक्रम निश्चित झाला. सर्व थकीत खातेधारकांना नोटीसा देण्यात आल्या. 410 ग्रामपंचायतींनी त्यांच्या थकित खातेधारकांना वसुलीच्या नोटीसा दिल्या त्यांना अनुसरून धुळे जिल्ह्यातील एकूण 8189 खाते धारकांनी एक कोटी 94 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा केली.

त्यापैकी धुळे तालुक्यात 2848, साक्री तालुक्यातील 3410, शिंदखेडा तालुक्यातील 1031 आणि शिरपूर मधील 900 खाते धारकांनी थकबाकी भरली. विक्रमी एक कोटी 1 लाख 25 हजार 375 रुपयांची वसुली साक्री तालुक्यातील झाली. सदर वसुली करसण्यासाठी साक्री तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी पाठपुरावा केला. जिल्हा परिषदेच्या सर्व विस्तार अधिकार्‍यांनी देखील आणि ग्रामसेवकांनी देखील वसुलीसाठी प्रयत्न केले.

Related Stories

No stories found.