धुळे : नांदवण येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार
धुळे

धुळे : नांदवण येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule- Nandwan

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नांदवण, ता. साक्री येथे उघडकीस आली आहे. याबाबत नराधमासह तिघांविरुध्द साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदवण येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला विशाल कारभारी सोनवणे याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. आणि त्या मुलीवर 5 ते 15 जुलै दरम्यान अत्याचार केला. त्याला कारभारी विष्णू सोनवणे व देवा माळीच यांनी मदत केली.

याबाबत पीडिताच्या वडिलांनी साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com