डॉ.भामरे आणि आ. रावल यांच्या प्रयत्नांतुन शिंदखेडा तालुक्यासाठी रेमडेसिव्हिरचा डोस

डॉ.भामरे आणि आ. रावल यांच्या प्रयत्नांतुन शिंदखेडा तालुक्यासाठी रेमडेसिव्हिरचा डोस

लवकरच रेल्वेचे कोविड सेंटर सुरू करण्याचा मानस

दोंडाईचा - Dondaicha - प्रतिनिधी :

कोरोनाच्या काळात रेमडेसिव्हिर या इंजेक्शनचा शिंदखेडा तालुक्यातील रुग्णांनाही तुटवडा भासत असल्याने माजी केंद्रीय मंत्री खा. डॉ. सुभाष भामरे व माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांच्या प्रयत्नातून रेमडेसिव्हिर उपलब्ध करण्यात आले.

लवकरच शिंदखेडा तालुक्यात मोठे कोविड सेंटर उभारण्यात येणार असल्याचा मानस या उभयतांनी व्यक्त केला आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, कामराज निकम, नगरसेवक जितेंद्र गिरासे, किशनचंद दोधेजा, भरतरी ठाकूर, विजय मराठे, कृष्णा नगराळे, डॉ सचिन पारख, डॉ. जयेश ठाकूर, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. तेजस जैन आदी उपस्थित होते.

करोनाच्या काळात रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन कोविड रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे. अशा प्रसंगी सर्वत्र या इंजेक्शनची मोठी मागणी होत आहे.

परंतु मागणी वाढल्यामुळे मोठी टंचाई या इंजेक्शनची भासत असल्याचे पाहून आ. रावल यांनी खा. भामरे यांना कळवून शिंदखेडा तालुक्यातही इंजेक्शन मिळावे असे सांगितले. त्यानंतर दोघांच्या प्रयत्नांनंतर या इंजेक्शनचा डोस उपलब्ध झाला आहे. त्याचा लाभ गरजू रुग्णांना होणार आहे.

कोविड सेंटर सुरू करणार

कोविड रुगांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यासाठी शिंदखेडा तालुक्यात दोंडाईचा येथील प्लॅटफॉर्म क्र. 3 वर रेल्वेचे कोविड सेंटर उभारणार असल्याचा मनोदय आ. रावल व खा. भामरे यांनी व्यक्त केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com