साक्री तालुक्यातील मालमाथा परिसरात पावसाचे थैमान
धुळे

साक्री तालुक्यातील मालमाथा परिसरात पावसाचे थैमान

ब्राम्हणवेल नजीक मोरी वाहून गेल्याने संपर्क तुटला

Rajendra Patil

धुळे । प्रतिनिधी

साक्री तालुक्यात मालमाथा परिसरातील निजामपूर, जैताणे, टिटाने, वासखेडी,ब्राह्मणवेल भागात दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. आज झालेल्या पावसाने ब्राम्हणवेल नजीक मोरी वाहून गेल्याने सम्पर्क तुटला आहे.

दोन दिवसापासून या भागात पावसाने थैमान घातले आहे .आज सायंकाळी परत जोरदार पाऊस झाल्याने वासखेडी - ब्राह्मणवेल दरम्यान मोरी वाहून गेली. परिणामी हा मार्ग बंद झाला आहे. शुक्रवारी द निजामपूर जैताणे सह टिटाने परिसरात अतिवृष्टी झाल्याने गावात पुराचे पाणी शिरले. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

आज दुपारी पुन्हा निजामपूर जैताणे सह वासखेडी, रूनमली, चिपलीपाडा, ब्राह्मणवेल, नवापाडा या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून वासखेडी -ब्राह्मणवेल मार्गावरील धनाई पुनाई फाटा मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com