धुळ्यात वादळी वार्‍यासह पाऊस

धुळ्यात वादळी वार्‍यासह पाऊस

विजेचे खांब वाकले, वृक्ष उन्मळले

धुळे । प्रतिनिधी Dhule

शहर व परिसरात वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळामुळे काही ठिकाणी विजेचे खांब वाकले तसेच विजेच्या ताराही तुटल्या. यामुळे विज पुरवठा खंडीत झाला होता. तर वृक्ष उन्मळून पडले.

मे हिटचा तडाखा धुळेकर अनुभवत असतांना आज दिवसभर ऊन सावलीचा खेळ सुरु होता. दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी 4 वाजेनंतर वातावरणात बदल झाला. साडेचार वाजता वादळ सुरु झाले. सुमारे 15 मिनिट वादळाचा जोर होता.

वादळामुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या प्रोफेसर कॉलनीत विजेचे खांब वाकले तर शहरातील अन्य भागात विजेच्या तारा तुटल्या. यामुळे विज पुरवठा खंडीत झाला. तर शहरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी लावण्यात आलेले फलक, होल्डींग वार्‍यामुळे फाटले. तर मुंबई- आग्रा महामार्गावर मालेगाव रोडवर वृक्ष उन्मळून पडला. यामुळे रस्त्यावर धावणारे वाहने थोडक्यात बचावली. तर एका घराच्या वॉल कंपाऊंडवर झाड पडल्याने कंपाऊंडचे बांधकाम तुटले.

दुपारी 4.40 वाजता पावसाला सुरुवात झाली. सुमारे 15 मिनिट पाऊस झाला. पाऊस झाला असला तरी उकाडा मात्र जाणवतच होता.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com