धुळे, दोंडाईचात पाऊस

धुळे, दोंडाईचात पाऊस

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरासह दोंडाईचा येथे दुपारी पावसाने हजेरी लावली. शहरात सलग दुसर्‍या दिवशी पाऊस झाला.

आज उकाडा जाणवत होता. परंतु दुपारी साडेचार वाजता पावसाला सुरूवात झाली. सुमारे अर्धा तास धुळ्याला पावसाने झोडपून काढले.

दोंडाईचा येथे सायंकाळी रिमझिम सुरुवात झाली.त्यानंतर जोरदार पाऊस झाला. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन झाले.

परिसरातील शेतकर्‍यांनी कापूस लागवड केली होती. परंतु पाऊस नसल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते, आज पाऊस झाल्याने काही अंशी पिकांना जीवदान मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com