हातगाडीवर दुचाकी ठेवून इंधन दरवाढीचा निषेध

धुळे येथे राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे आंदोलन
हातगाडीवर दुचाकी ठेवून इंधन दरवाढीचा निषेध

धुळे । प्रतिनिधी Dhule

पेट्रोल-डिझेलसह गॅसच्या दरवाढीमुळे विरोधात आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. हातगाडींवर दुचाकी ठेवून शहरातून रॅली काढत केंद्रशासन विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनाने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले. आंदोलनात युवक प्रदेश उपाध्यक्ष सत्यजीत शिसोदे, प्रदेश सचिव सुमित पवार, शहर जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, ग्रामिणचे जिल्हाध्यक्ष मयुर बोरसे,नगरसेवक वसीम बारी, शहर सचिव राजू चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष मनोज कोळेकर, निखिल वाघ,एजाज शेख, दानिश पिंजारी, स्वप्नील पाटील, ललीत, कार्तिक मराठे,निखिल पाटील, विनोद बच्छाव,आंनद पाटील, सागर चौगुले, अनिकेत माईनकर, निलेश चौधरी आदी सहभागी झाले होते

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com