<p>धुळे । प्रतिनिधी Dhule</p><p>समाज आहे तर आपण आहोत. प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहीजे. समाजाची रक्षा करणे हा आपला धर्म आहे. जो समाजाचे काम करेल तोच पुढे जाईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज केले.</p>.<p>धुळ्यात नूतन महापालिकेच्या आवारात आज राज्यपाल कोश्यारी याच्या हस्ते जिल्ह्यातील 34 कोरोना योध्दांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर चंद्रकांत सोनार, खा.डॉ.सुभाष भामरे, माजीमंत्री तथा आ. जयकुमार रावल, आयुक्त अजिज शेख आदी उपस्थित होते. तसेच आ.फारूक शाह, माजी आ.राजवर्धन कदमबांडे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दिघावकर, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी साबळे, आदींसह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा महापालिकेकडून मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.</p>