जिल्हा पोलिस दलातील 249 पोलिस कर्मचार्‍यांना पदोन्नती

65 पोलिस हलवादार झाले सहाय्यक उपनिरीक्षक
जिल्हा पोलिस दलातील 249 पोलिस कर्मचार्‍यांना पदोन्नती

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्हा पोलिस दलातील 249 पोलिस कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांनी मंगळवारी सायंकाळी हे आदेश काढले.

जिल्हा पोलिस दलाल पोलिस मुख्यालयासह विविध पोलिस ठाण्यात कार्यरत 249 कर्मचार्‍यांची नियमित पदोन्नती करण्यात आली आहे.

त्यात 65 पोलिस हवालदारांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी तर 92 पोलिस नाईक यांना पोलिस हवालदारपदी, 92 पोलिस शिपाई यांना पोलिस नाईक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पदोन्नती झालेल्या पोलिस अंमलदारांची पदोन्नतीची वेतन निश्चिती तत्काळ करण्याच्या सुचनाही पोलिस अधिक्षकांनी दिल्या आहेत. पदोन्नती झालेल्या सर्व कर्मचार्‍यांचे पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांनी कौतूक केेले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com