धुळ्यातील महत्वाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य

नवनियुक्त आयुक्त देविदास टेकाळे यांनी पदभार स्वीकारला; पदाधिकार्‍यांनी केले स्वागत
धुळ्यातील महत्वाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य

धुळे Dhule । प्रतिनिधी

शहरातील समस्यांचा आढावा (Review of problems in the city) घेऊन महत्त्वाचे प्रश्न आधी सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल, असे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त देविदास टेकाळे (Newly appointed Commissioner Devidas Tekale) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले.

महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त देविदास टेकाळे यांनी अजीज शेख यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे महापौर चंद्रकांत सोनार, विरोधी पक्ष नेते कमलेश देवरे, सभागृह नेते राजेश पवार, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस आदींनी स्वागत केले.

महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या बदलीचे बुधवारी रात्री उशिरा आदेश निघाले. त्यांच्या जागेवर लातूरचे देविदास टेकाळे यांची नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी गुरूवारी दुपारी पदभार स्वीकारला. मावळते आयुक्त अजीज शेख यांनी त्यांचे स्वागत केले. आयुक्त टेकाळे यांनी सांगितले की, धुळे शहराची फारशी माहिती नाही.

प्रथम शहराची संपूर्ण माहिती घेवून महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर अन्य कामाचे नियोजन करण्यात येईल. शहरात डेंग्यू, कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी उपाययोजना राबवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान आयुक्त टेकाळे यांनी यापूर्वी लातूर महापालिकेत आयुक्त म्हणून काम केले आहे. तसेच ते नाशिकला प्रशासकीय अधिकारी, कल्याण- डोंबिवली, वसई, विरार महापालिकेत सहायक आयुक्त, आयुक्त तसेच नालासोपारा, तळेगाव, संगमनेर, बीड येथील नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. ते मूळ बीड जिल्ह्यातील आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com