धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात 182 ग्रामपंचायतींसाठी शांततेत 77 टक्के मतदान झाले. तर मतमोजणी चार तालुक्यांच्या ठिकाणी दि. 18 जानेवारी रोजी होणार आहे. मतमोजणीची तयारी पुर्ण झाली असून प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज आहे.

काल निवडणूक झाल्यानंतर मतपेट्या त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी पोहचविण्यात आल्या असून त्या मतपेट्या स्ट्राँग रुममध्ये सील करुन ठेवण्यात आल्या आहेत.

स्ट्राँग रुमसमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणीच्या दिवशी स्ट्राँग रुममधून मतपेट्या बाहेर काढण्यात येतील.

त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यासाठी पोलीस यंत्रणेने नियोजन केले आहे. तर मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.