प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान ठरणार गुन्हा..

प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान ठरणार गुन्हा..

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे

धुळे | Dhule प्रतिनिधी

गर्भधारणपूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) Prenatal gynecological diagnosis कायद्यानुसार (पीसीपीएनडीटी) प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान करणे गुन्हा असून असे कृत्य करणार्‍याची माहिती संकेतस्थळ व टोल फ्री क्रमांकावर द्यावी. तक्रार, माहिती देणार्‍यास बक्षीस देवून त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक तथा समुचित प्राधिकारी डॉ. महेश भडांगे Dhule District Surgeon Dr. Mahesh Bhadange यांनी दिली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक तथा समुचित प्राधिकारी, महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा समुचित प्राधिकारी यांना पीसीपीएनडीटी प्रकरणासंदर्भात मदत व साहाय्यासाठी गर्भधारणपूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) Prenatal gynecological diagnosis कायद्यातील कलमान्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार जिल्हा सल्लागार समिती पुनर्गठित करण्यात आली आहे.या समितीची द्विमासिक बैठक नुकतीच झाली. बेकायदेशीरपणे गभलिंग निदान व गर्भपात होत असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, धुळे व महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, धुळे यांच्याकडे प्रत्यक्ष किंवा अर्जाद्वारे कोणीही, कधीही तक्रार नोंदवू शकतो. माहिती देणार्‍यास खबर्‍या बक्षीस योजनेअंतर्गत शासनाकडून एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तसेच माहिती देणार्‍या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भडांगे Dhule District Surgeon Dr. Mahesh Bhadangeयांनी सांगितले.

समितीचे ऍड. चंद्रकांत येशीराव अध्यक्ष

पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी ऍड. चंद्रकांत मोहन येशीराव, सदस्य अर्चना विजयराव देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी, धुळे, डॉ. अभिनय भास्कर दरवडे, डॉ. पल्लवी आदित्य भतवाल, डॉ. योगेश प्रकाश ठाकरे, ऍड. उमेश विठ्ठल सूर्यवंशी, कायदा सल्लागार जयश्री अभिमन्यू शहा, शोभाबाई हरी जाधव यांचा समितीत समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com