Photo गांजा शेतीवर पोलिसांची धाड

Photo गांजा शेतीवर पोलिसांची धाड

सव्वा दोन लाखांची झाडें जप्त, शिरपूर तालुका पोलीसांची कामगिरी

धुळे - प्रतिनिधी Dhule

शिरपूर (Shirpur) तालुक्यातील दुर्गम भागातील सुळे, भोरखेडा शिवारात (Forest land) वनजमिनीवरील गांजाच्या शेतावर काल तालुका (police) पोलिसांनी कारवाई केली. सव्वा दोन लाखांचा 112 किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली.

याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरपूर तालुक्यातील लाकडया हनुमान गावाचे पुढे पीरपाण्यापाडा ते सोज्यापाडा या कच्च्या रस्त्यालगत शेतात गांजा सदृश्य अंमली पदार्थाच्या वनस्पतीची बेकायदेशीरपणे लागवड केली असल्याची गुप्त माहिती तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट (API Suresh Shirsat) यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी शिरपुर पोलीस ठाण्याचे एक पथक तयार केले.

Photo गांजा शेतीवर पोलिसांची धाड
महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

सदर ठिकाण हे अतिशय दुर्गम अशा डोंगराळ भागात असल्याने पथकाला काही अतंर मोटार सायकलीवर जावे लागले. सदरचे ठिकाण हे परिमंडळ सुळे येथील नियतक्षेत्र भोरखेडा येथील कंपार्टमेंट क्रमांक १०२० येथील वनक्षेत्र जमीनीवरील एका शेतात होते. सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास पथक तेथे पोहचले. तेथे शेतात गांजा सदृश्य अंमलीपदार्थ वनस्पतीचे झांडाची लागवड केलेली दिसुन आली. शेतात एक ते अडीच फुटांपर्यंतची झाडे दिसून आली. ती उपटून एकुण 112 किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली. त्याची किंमत 2 लाख 25 हजार 600 रूपये इतकी आहे.

याप्रकरणी पोना कुंदन पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय दीपक वारे करीत आहेत.

Photo गांजा शेतीवर पोलिसांची धाड
एसटी बस-दुचाकीचा अपघात ; पती पत्नी ठार

ही कारवाई पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत (Superintendent of Police Chinmay Pandit), अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव (Upper Superintendent of Police Prashant Bachhav) व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि सुरेश शिरसाठ, पोसई दिपक वारे, महिला पोसई लक्ष्मी करनकाळ, असई लक्ष्मण गवळी, पोहेकॉ हेंमत पाटील, संजय देवरे, सईद शेख , पोना.कुंदन पवार, पोकॉ योगेश दाभाडे, योगेश मोरे, प्रकाश भिल , संतोष पाटील तसेच वनविभागाचे स्वाती गवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी सांगवी व वनरक्षक अनिल पाटील व ज्ञानेश्वर शिरसाठ यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com