पॉडकास्ट : समाजसेविका मेधा पाटकर का चिडल्यात?

केंद्राने खर्चावर आळा घालावा, महाराष्ट्र सरकारही चुकलेच
पॉडकास्ट : समाजसेविका मेधा पाटकर का चिडल्यात?

धुळे । प्रतिनिधी Dhule

केंद्रातील सरकार बहुमताच्या जोरावर हुकूमशाही करत आहे. नको त्या ठिकाणी पैशांची उधळण करत आहे. सरदार वल्लभ भाईंच्या पुतळ्यावर तब्बल साडे तीन हजार कोटी रुपये खर्च.. तर हजारो कोटी खर्चून पुन्हा नवीन संसद भवन...काय गरज आहे? शासकीय कार्यलये सुशोभित करणे, मंत्र्यांची बंगले सजविणे, आता हे थांबले पाहिजे. इतर देशात शिक्षण आणि आरोग्यावर एकूण बजेट च्या तीस टक्के तरतूद असते, आपल्या कडे ती फक्त तीन टक्के इतकीच आहे. आता सरकारने प्रायोरिटीज बदलल्या पाहिजेत

महाराष्ट्राचे कौतुक अन नाराजी

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजन प्लान्ट उभारायला हवे होते, ही या सरकारची चूकच झाली. पण या लाटेत सरकारने 80 टक्के बेड स्वतःकडे घेतले हे बरेच केले. शिव भोजनातून रोज हजारो भुकेले जेवत आहेत ते ही दर्जेदार अन्न, ही बाब समाधानकारक असल्याचे सांगत सरकारचे कौतुक ही केले.

पण 7 वे वेतन देणाऱ्या सरकारने गरजेच्या सेवा भकाम केल्या नाहीत, रिक्त जागा भरल्या नाहीत, व्यवस्था सुधारली नाही , या बद्दल श्रीमती पाटकर यांनी नाराजीही व्यक्त केली. यावेळी त्यांच्या सोबत यंग इंडिया फाऊंडेशनचे संदीप देवरे हेही उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com