देवपूरात रस्त्यांवर खड्डे, शिवसेनेचे आंदोलन

देवपूरात रस्त्यांवर खड्डे, शिवसेनेचे आंदोलन

धुळे Dhule । प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या पावसामुळे देवपूरात Devpura रस्ते खराब Roads bad झाले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे चालणेही अवघड झाले आहे. अजय नगरमध्ये खड्डेमय रस्त्यावर पाय घसरुन Slipping feet गरोदर महिला पडली. तिच्या मदतीसाठी नागरिकांसह शिवसेनेचे Shiv Sena देवपूर शाखेचे पदाधिकारी धावले. त्यानंतर संतप्त नागरिक व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी रस्त्यांवरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात उभे राहून महापालिका, Municipal Corporation एमजीपी MPG व ठेकेदार Contractor विरोधात निषेध आंदोलन Protest movement केले.

शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवपूरातीला भूमिगत गटार योजनेसाठी खोदकाम झाले. विविध कालॅन्यांमध्ये रस्त्याच्या मधोमध खोदकाम करण्यात आले. अटीशर्तीनुसार खोदकामानंतर रस्ता पुर्ववत दुरुस्ती करुन देण्यात येणार होता. परंतू ठेकेदाराने रस्ता दुरुस्त केला नाही. त्यामुळे रस्त्यांची वाट लागली. अजय नगरमध्ये गरोदर महिला पाय घसरुन पडल्यानंतर नागरीक संतप्त झाले. नागरीक शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी निषेध आंदोलन केले.

धोकेदायक खड्ड्यांची व चिखलमय मार्गांची दुरुस्ती करुन कायम स्वरुपी रस्ता तयार करावा. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा यावेळी आंदोलक शिवसेना महानगरप्रमुख मनोज मोरे, प्रफुल्ल पाटील, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, उपमहानगर प्रमुख ललित माळी, हरिष माळी, संजय वाल्हे, दिनेश पाटील आदींनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com