पिंपळनेर - Pimpalner - वार्ताहर :

साक्री तालुक्यातील मौजे करंजटी येथे लुपिन फाऊंडशेनव्दारे सुरू असलेल्या कार्यक्रमातंर्गत नुकतेच तज्ज्ञांनी भेट दिली.

त्यांनी थेट बांधावर जावून शेतकर्यांना पाणी बजेटसह विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

मौजे करंजटी येथे नाबार्डच्या अर्थ सहाय्याने व लुपिन फाऊंडेशनद्वारे हवामान बदल अनुकूलन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पातंर्गत नुकतेच ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकारचे रिसर्च फेलो विवेक शिंदे, लुपिन फाऊंडेशनचे अभियंता किशन देवरे व जिवशास्त्र तज्ज्ञ आकाश राठोड यांनी करंजटी गावाला भेट देत गावकरी व शेतकर्यांशी संवाद साधला.

प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन शेती विषयक प्रश्नांची माहिती घेतली. गाव पातळीवर आणि प्रत्यक्ष शेतात पिक घेतांना पाणी वापराचा ताळे बंद म्हणजेच बजेट कसा असावा, या विषयी मार्गदर्शन केले.

बदलत्या हवामानात शाश्वत विकास साधतांना रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखे प्रयत्न तसेच पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे हे अत्यंत महत्वाचे आहे, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

लुपिन सारखी संस्था ग्राम विकासाचे अभिनव काम करीत आहे. लोक सहभागातून आणि लुपिन सारख्या संस्थेच्या माध्यमातून विकासाचे नवीन मॉडेल उभे राहत असल्याचे सांगत लुपिन फाऊंडेशनच्या कामाचे कौतूकही विवेक शिंदे यांनी यावेळी केले.