सिनेस्टाईल पाठलाग करत पकडली अवैध दारू

पिंपळनेर पोलिसांची कारवाई, दोन वाहनांसह 16 लाखांचा मुद्येमाल जप्त, दोघे ताब्यात
सिनेस्टाईल पाठलाग करत पकडली अवैध दारू

पिंपळनेर - Pimpalner - वार्ताहर :

पिंपळनेर-सटाणा रस्त्यावर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत अवैधरित्या देश-विदेशी दारूची वाहतूक करणार्‍या दोन वाहनांना पकडले. वाहनांसह 16 लाख 40 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दोघांना ताब्यात घेण्यात आले.

पिंपळनेर-सटाणा रस्त्यावर अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती सपोनि सचिन साळुंखे यांना मिळाली.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भूषण हंडोरे, पोहेकॉ. वळवी, पोना. निलेश महाजन, पोकॉ.भुषण वाघ, ग्यानसिंग पावरा, प्रविण सोनवणे, पंकज वाघ, रविंद्र सुर्यवंशी, वेंदे रस्त्यावर गस्त सुरू केली. पहाटे 3.25 वाजेचे सुमारास शेलबारी गावाचे शिवारातील हॉटेल देवनारायण जवळ जीजे 05- जे एफ 2466 व जीजे 21- एएच 9390 ही वाहने उभे दिसले.

चालकांना पोलीस आल्याची चाहुल लागताच त्यांनी वाहने काढत सुसाट वेगाने देशशिरवाडे गावाकडे निघाले. पोलीसांनी देखिल त्यांचा पाठलाग सुरु केला.

त्यादरम्यान समोरुन अचानक मोठी वाहने आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला हे पाहुन दारू वाहतूक चालकांनी त्यांची वाहने रस्त्यातच रस्त्याचे काम सुरु असलेल्या मालतीचे ढिगार्‍यामध्ये घालुन उभी करुन अंधारात पळु लागले.

पोलिसांनी त्यांचा अंधारात पाठलाग सुरू केला. रस्त्यावर दगड-माती व सिमेंट रोडवर पडले असताही पोलिसांनी त्यांना पकडले. विरेंद्रसिंह गिरधारीसिंह राठोड (वय 32) व जितेंद्रसिंह गिरधारीसिंह राठोड (वय 30 रा.रेह, ता.दहीमथा जि.भिलवाडा राजस्थान) अशी दोघांनी त्यांची नावे सांगितली.

वाहनांची तपासणी केली असता त्यात 1 लाख 90 हजार रुपये किंमतीची देशी-विदेशी दारूचा साठा मिळून आला. दोन्ही वाहनांसह दारू असा एकुण 16 लाख 40 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.