नशेच्या औषधाची चोरटी वाहतूक

पिकअपसह साठा जप्त ; पिंपळनेर पोलिसांची कारवाई
नशेच्या औषधाची चोरटी वाहतूक

पिंपळनेर - Paimpalner - वार्ताहर :

पिपळनेर-नाशिक रस्त्यावरील शेलबारी शिवारात पोलिसांनी सापळा रचून नशेच्या औषधांची वाहतूक करणार्‍या वाहनाल पकडले. 14 हजारांची औषधी व पिक पिकअप वाहना असा एकुण 3 लाख 34 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पिंपळनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्यासह पथकाने आज दुपारी ही कारवाई केली. शेलबारी येथे हॉटेल सरकार जवळ सापळा लावून पिकअप वाहनला (क्र. जीजे 26 टी 2610) पकडले.

तपासणी केली असता वाहनात डॉक्टरांच्या सल्याशिवाय विक्री करण्यास प्रतिबंध असलेले रेक्सान टी या गुंगीकारक औषधीचा साठा मिळून आला. पोलिसांनी वाहनासह चालकाला ताब्यात घेतले.

नाझिम इब्राहीम पटेल (वय 29, रा. कांजा फाटक, महादेव नगर, व्यारा, जि. तापी, गुजरात) असे चालकाने त्याचे नाव सांगितले. 14 हजा 400 रूपये किमतींची औषध, 3 लाख 20 हजारांचे वाहन असा एकूण 3 लाख 34 हजार 400 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी औषध निरीक्षक श्याम साळे यांच्या फिर्यादीवरून एकावर पिंपळनेर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोहेकाँ शिरसाट हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com