पिंपळनेरात भरदिवसा धाडसी चोरी

पिंपळनेरात भरदिवसा धाडसी चोरी

पिंपळनेर - Pimpalner - वार्ताहर :

येथील वृंदावन नगरात चोरट्यांनी भरदुपारी धाडसी घरफोडी करत दागिन्यांसह अडीच ते तीन लाखांची रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील वृंदावन नगर या नवीन कॉलनीमध्ये राहणारे रतिलाल हरिचंद्र बागले (वय 55) यांचा रेडीमेट बूट, चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे.

त्यांनी आज नवीन वाहन घेतले. त्यानिमित्त ते आज सकाळी धनाईपुनाई देवीच्या दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून दुपारी चार वाजता ते घरी आले.

तेव्हा घराचे कुलुप व कडी-कोयंडा तुटलेला दिसला. आत प्रवेश केल्यावर घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले होते.

तर सोन्या-चांदीचे दागीने व 80 ते 85 हजारांची रोकडे असा एकुण अडीच ते तीन लाखांचा ऐवज चोट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

याबाबत रतिलाल बागले यांनी पिंपळनेर पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com