कलाप्रेमी शिक्षक राजेंद्र भदाणे यांचा पांडुरंग भाव

खडूने साकारले सुरेख चित्र
कलाप्रेमी शिक्षक राजेंद्र भदाणे यांचा पांडुरंग भाव

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

येथिल कलाशिक्षक राजेंद्र भदाणे यांनी खडूच्या साहाय्याने अतिशय सुंदर असे पांडुरंगाचे चित्र साकारले आहे. फलक लेखनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे संदेश देणारे हजारो चित्र त्यांनी आजपर्यंत काढले असून प्रत्येक चित्रात वेगळेपण जपले आहे.

यंदाही आषाढी एकादशी वर कोरोनाचे सावट आहे. मंदिरे बंदच आहेत. मात्र लाडक्या पांडुरंगाची ओढ कायम आहे. मनामनातील हाच भाव ओळखून श्री भदाणे यांनी खडूने अतिशय सुरेख असे चित्र साकारले आहे.

तालुक्यातील गरताड शाळेत कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्री भदाणे यांचा चित्रकलेत हातखंडा आहे. गेल्या 29 वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. आज पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर हजारो चित्र काढून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मात्र आता चित्रकला परद्याआड होत असल्याने खडूच्या साहाय्याने फलक लेखन करून ते सामाजिक प्रभोधनाचे कार्य करीत आहेत. महा पुरुषांची जयंती- पुण्यतिथी, दिनविशेष, पर्यावरण, वृक्ष संवर्धन, या सोबतच सण- उत्सव, आदी विषयांवर त्यांनी फलक लेखन केले आहे.

बेटी बचाव, शिक्षण या विषयांसह कोरोनाचा विषय देखील चित्राच्या माध्यमातून साकारून त्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

कलेची आवड असल्याने पूर्वी ते गणेशोत्सवाचे डेकोरेशन करण्यात आपली वेगळी झलक दाखवत असत. परंतु आता उत्सवांचे स्वरूप बदलत चालले आहे. डिजिटल मुळे चित्रकला मागे पडते आहे. मात्र शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा या कलेकडे कल वाढला, त्यांच्यात आवड निर्माण व्हावी, यासाठीच श्री. भदाणे हे सातत्याने फलक लेखनाद्वारे वेगळेपण जपण्याचा प्रयन्त करीत आहेत. त्यांनी आषाढी निमित्त यंदाही साकारलेल्या पांडुरंगाच्या चित्राने साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com