12 तासांच्या आत चोरटे गजाआड ; चाळीसगाव रोड पोलिसांची कामगिरी

12 तासांच्या आत चोरटे गजाआड ; चाळीसगाव रोड पोलिसांची कामगिरी

मुद्येमाल हस्तगत, कबीरगंजमधील चोरीचा उलगडा

धुळे । प्रतिनिधी Dhule

शहरातील कंबीरगंज (Kambirganj) परिसरातून शिरपूर (Shirpur) तालुक्यातील ठेकेदाराचे साहित्य चोरणार्‍या तिघांना (Chalisgaon) चाळीसगाव रोड पोलिसांनी बारा तासांच्या आतच जेरबंद केले.

12 तासांच्या आत चोरटे गजाआड ; चाळीसगाव रोड पोलिसांची कामगिरी
कार अपघातात कन्नडचे तीन तरुण ठार, पाच जखमी
12 तासांच्या आत चोरटे गजाआड ; चाळीसगाव रोड पोलिसांची कामगिरी
दामदुपटीचे आमिष; 12 लाखांचा घातला गंडा

त्यांच्याकडून दुचाकीसह सव्वा लाखांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. शिंगावेतील येथील संत तुकाराम नगरातील रहिवासी असलेल्या ठेकेदार अश्‍विन भावराव माळी (वय 21) याच्या वडीलांनी महापालिकेकडून कबीरगंज येथील रस्ता कामाचा ठेका घेतला होता. त्यासाठी त्यांनी 13 लोखंडी चॅनल, एक जनरेटरचा डायनामा असे 75 हजारांचे साहित्य आणले होते. पंरतू दि. 18 ते 19 ऑगस्टदरम्यान रात्री अज्ञात चोरट्यांनी तेथून ते साहित्य लंपास केले. याबाबत काल अश्‍विन माळी याने चाळीसगाव रोड पोलिसात (Chalisgaon Road Police) दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांनीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास करीत असतांना हा गुन्हा कबीरगंज परिसरातील शब्बीर शाह सुलेमान शहा याने त्यांच्या साथीदारांसह केला असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शोध घेत शब्बीर शाह (वय 32 रा. कबीर गंज, पाणी टाकी जवळ, धुळे) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हा गुन्हा साथीदार जावेद शेख सलीम (रा.सत्तारच्या वाड्याच्या मागे, धुळे) व शाहरूख राजू पठाण (वय 21 रा. कबीरगंज, धुळे) याच्यासह केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, पाच लोखंडी अँगल व जनरेटरचा डायमा असा एकुण 1 लाख 35 हजार रूपयांचा मुद्येमाल जप्त केला.

ही कामगिरी पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत (Superintendent of Police Chinmay Pandit), अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील, उपनिरीक्षक योगेश टीकले, हवालदार के. ऐन. वाघ, एस. जी.कढरे, अविनाश पाटील, हेमंत पवार, स्वप्निल सोनवणे, प्रशात पाटील, मुकेश पावरा याच्या पथकाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com