जैतपूर येथे आणखी 7 मोरांचा मृत्यू !

बियाणे खाल्यामुळे विषबाधेचा संशय
जैतपूर येथे आणखी 7 मोरांचा मृत्यू !
जैतपूर येथे आणखी 7 मोरांचा मृत्यू !
जैतपूर परिसरात १२ मोरांचा मृत्यू

कुरखळी - Kurkhali - वार्ताहर :

देशाच्या राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मोरांचा दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने जैतपूरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रथम 12 मोरांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर तीन दिवसात आणखी 7 मोरांचा मृत्यू झाला आहे.

शिरपूर तालुक्यातील जैतपूर येथील दादा राजपूत यांच्या पडीत क्षेत्रात दि 1 जून रोजी दुपारी मोर मृत्यू मुखी पडलेले दिसून आले. शोध घेतला असता परिसरात एकुण 12 मोर मृतावस्थेत आढळून आले.

विषयुक्त अन्न खाल्यामुळे मोरांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक आंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर दोन ते तीन दिवसात आणखी 7 मोरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या मृत मोरांवर वनविभाग व प्राणीमित्रांनी अत्यसंस्कार केले.

शिरपुरचे वनरक्षक एम.के.गुजर हे घटनास्थळी व परिसरात गस्त करीत आहेत. त्यांना नेचर कझर्वेशनचे सदस्य अभिजित पाटील, योगेश वारुळे तसेच सरपंच, पोलीस पाटील यांचे सहकार्य मिळत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com