मृतदेह आढळून आला त्यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती
मृतदेह आढळून आला त्यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती
धुळे

पांझरा नदी पात्रात मृतदेह आढळला

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील पांझरा नदी पात्रात आज सकाळी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. तो पांझरेच्या पुरात वाहून आला आहे. दरम्यान यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.

देवपूरातील वीर सावरकर पुतळा ते मोठा पुल दरम्यान आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास पांझरा नदी पात्रातून एक मृतदेह पाण्यात वाहून येत असतांना नागरिकांना दिसून आला. काही तरूणांनी त्याला बाहेर काढले. याबाबत देवपूर व शहर पोलिसांना माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच देवपूर पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल एस.बी.चिंचोलीकर, आय.एन. ईशी, बी.बी.बागुल, पी.सी. आखाडमल, राठोड तसेच शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शहर पाटील, हेकाँ पंकज खैरमोडे आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली.

मृतदेहाच्या अंगावर हिरवा टिशर्ट व काळी पॅन्ट होती. तसेच एका हातात कडे व दोरा बांधलेला होता. त्यांच्याजवळ कुठलेही कागपत्रे आढळून न आल्याने ओळख पटू शकली नाही.

दरम्यान या इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला की घातपात? असाचा, याचा पोलिस शोध घेत आहेत. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com