पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यात भात रोपणीला सुरुवात

पावसाअभावी रखडल्या होत्या पेरण्या
पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यात भात रोपणीला सुरुवात

पिंपळनेर - वार्ताहर Dhule

गेल्या पाच सहा दिवसापासून पिंपळनेर (Pimpalner) सह आदिवासी पश्चिम पट्ट्यात संततधार पावसाचा मुळे रखडलेली भात रोपणीला सुरुवात झाली आहे.

पिंपळनेर व परिसरात दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरवली होती त्यामुळे पिंपळनेर व आदिवासी पश्‍चिम पट्ट्यात पेरण्या लाबल्या होत्या आदिवासी भागात भात व नागली पिकाचे रोपांचे वाफे तयार होते.

मात्र पाऊस नसल्यामुळे पेरण्या रखडल्या होत्या गेल्या पाच सहा दिवसापासून पिंपळनेर व परिसरात पावसाने चांगली हजेरी दिल्यामुळे सोयाबीन मका बाजरी या पिकांच्या पेरण्या संपत आल्या मात्र आदिवासी पश्चिम पट्ट्यामध्ये संततधार पावसात चिखल तुडवत भात व नागली रोपणी करावी लागते चांगला पाऊस झाल्यामुळे आदिवासी पट्ट्यात खरड बारी बर्डीपाडा उमरपाटा शेंदवड मांजरी मोहगाव बसरावळ भागात भात व नागली रोपनीला सुरुवात झाली आहे भात व नागली चे रोप वाक्यातून काढून तूडवलेल्या चिखलात त्याला अवनी असे म्हणतात भात रोपणी सुरु झाल्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळाले पिंपळनेर पश्चिम पट्ट्यातील तांदूळ हा चवीसाठी अतिशय उत्तम असल्यामुळे या तांदळाला मोठी मागणी असते तसेच नागली पापड उद्योगासाठी नागलीचे ही उत्पन्नाला मोठी मागणी असते उशिरा का असेना पाऊस यापुढेही येईल या आशेवर आदिवासी बांधव भात व नागली रोपणी करत आहे.

Related Stories

No stories found.